कर्नाटकातील घटनेच्या निषेधार्थ देवळा येथे जैन बांधवांकडून मूक मोर्चा

0
49
देवळा / कर्नाटक येथील जैनाचार्य कामकुमारनन्दीजी मुनिराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देताना राजेंद्र लुंकड ,अशोक सुराणा,प्रवीण सुराणा आदी (छाया - सोमनाथ जगतात)

देवळा: कर्नाटक येथील जैनाचार्य परमपूज्य आचार्य श्री 108 कामकुमारनन्दीजी मुनिराज यांच्या हत्येचा येथील जैन समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात येऊन पोलीस निरीक्षक निरीक्षक दीपक पाटील ,तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले.

देवळा / कर्नाटक येथील जैनाचार्य कामकुमारनन्दीजी मुनिराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देताना राजेंद्र लुंकड ,अशोक सुराणा,प्रवीण सुराणा आदी (छाया – सोमनाथ जगतात)

कर्नाटक येथील जैनाचार्य परमपूज्य आचार्य श्री 108 कामकुमारनन्दीजी मुनिराज यांच्या हत्येचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी देवळा सकल जैन समाजाच्या वतीने जैन स्थानक येथून मूक मोर्च्या काढत जैन साधु संतांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. सकल जैन समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात व तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले .यावेळी संघ पती राजेंद्र लुंकड, सचिन सुराणा, अभय संकलेचा , अशोक सुराणा, प्रवीण सुराणा, मांगीलाल लुंकड ,मनोज चोरडिया , रमेश कलावडिया , अमित बोरा, सुनील बुरड, जयेश संकलेचा आदी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here