कापशी गावात डीपीवर शॉक लागून माकडाचा मृत्यू

0
29

देवळा: कापशी गावात माकड मोर व रानडुक्करांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार हे प्राणी व मोर गावात व शिवारात वावरत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

आज कापशी येथील शेतकरी तुकाराम आनंदा भदाणे यांचे जवळील डीपी क्रमांक 5 वर एका माकडाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. हे प्रकार वारंवार होऊ नये याकरिता कापशी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे प्रतिबंधक उपाय करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी mseb चे कर्मचारी भूषण भदाणे तात्काळ हजर होऊन पुढील कार्यवाही करत आहेत. यावेळी योगेश भदाणे, महेश भदाणे,नितीन भदाणे, भूषण भदाणे,ओम भदाणे,गणेश भदाणे, उत्तम भदाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वनविभागाने यात लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ करून प्राण्यांचे जीव वाचतील व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबविण्याची मागणी संयुक्त वनव्यवस्थापन समिती कापशी चे अध्यक्ष जयदीप भदाणे, उपाध्यक्ष विजय भदाणे , आबा भदाणे, वाळू माळी, महेश भदाणे व ग्रामस्थांमार्फत केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here