देवळा : कणकापूर येथे राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व ग्रामपंचायत कणकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही दिवसांपासून बांधकाम कामगार नोंदणी चालू असून ,नोंदणी झालेल्या लोकांसाठी आज अटल आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यात जवळपास 50 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशी माहिती ग्रामपंचात सदस्य व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश शिंदे यांनी दिली . लवकरच उर्वरित लाभार्थ्यांचीहि आरोग्य तपासणी केली जाईल. ह्या आरोग्य शिबिरात घेण्यात येत असलेल्या 50 चाचण्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केल्यास 25000 ते 30000 रुपये खर्च येतो, शासनाच्या माध्यमातून घ्या चाचण्या मोफत होणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच बारकू वाघ, उपसरपंच अनुराधा जैन आदींसह सुरेश बर्डे, मधुकर पवार, पांडुरंग पिंपळसे, हिरामण बच्छाव, विजय जैन, लक्ष्मण शिंदे, अशोक शिंदे, कौतिक शिंदे, संजय बच्छाव, कैलास महाले, नंदू शिंदे, शशिकांत शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते मालेगाव येथील हिंद लॅबच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम