कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे जगदीश शिंदे यांची बिनविरोध निवड

0
9
कणकापूर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच जगदीश शिंदे समवेत डॉ किरण शिंदे,सरपंच बारकू वाघ ,माजी उपसरपंच अनुराधा जैन आदींसह सदस्य व ग्रामस्थ (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा | सोमनाथ जगताप
तालुक्यातील कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपचे जगदीश नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कणकापूर सत्तांतर होऊन माजी उपसरपंच जे दि शिंदे, अड तुषार शिंदे ,नामदेव शिंदे ,नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने स्पष्ट बहुमत प्राप्त करून भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कणकापूर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच जगदीश शिंदे समवेत डॉ किरण शिंदेसरपंच बारकू वाघ माजी उपसरपंच अनुराधा जैन आदींसह सदस्य व ग्रामस्थ छाया सोमनाथ जगताप

समाज व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्ष रहा ; महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा

यानंतर झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत पहिल्यांदा अनुराधा जैन यांची उपसरपंच पदी वर्णी लागली. यावेळी श्रीमती जैन यांनी दिलेल्या शब्दाला जागे होत एका महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला . आज सोमवारी दि २७ रोजी उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सरपंच बारकू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली . यात सर्वानुमते उपसरपंच पदी जगदीश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मावळत्या उपसरपंच अनुराधा जैन ,ग्रामपंचायत सदस्य गोविंद बर्वे, जिजाबाई मोरे,बिबबाई बच्छाव,बीजलाबाई बर्डे ,सुशिलाबाई पवार,किरण गांगुर्डे, पांडुरंग पिंपळसे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका जयश्री आहेर यांनी कामकाज बघितले.

नवनिर्वाचित उपसरपंच जगदिश शिंदे यांचे डॉ किरण शिंदे, गणपत शिंदे, बायजाबाई शिंदे, दादाजी शिंदे, भास्कर शिंदे , कौतिक शिंदे , लक्ष्मण शिंदे , दिलीप जैन, लखा शिंदे , रमण सावकार, सुधाकर शिंदे, कारभारी शिंदे , दोधा शिंदे, संजय शिंदे, बापू शिंदे, अशोक शिंदे, आबा शिंदे, नितीन शिंदे, हिरामण बच्छाव, रवी टेलर, सोनू शिंदे, सागर बकुरे, ऋषी गोसावी, संदीप शिंदे, दादाजी गोसावी, रवी बर्वे, योगेश गांगुर्डे ,राकेश बर्वे, योगेश शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शिंदे यांच्या निवडीचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार ,आमदार डॉ राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, अतुल पवार ,संभाजी आहेर ,भाऊसाहेब पगार,जितेंद्र आहेर ,नानू आहेर आदींनी अभिनंदन केले आहे.

उपसरपंच निवड प्रसंगी जगदीश शिंदे यांच्या वतीने गावातील सर्व ग्रामस्थांना भगवा फेटा परिधान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . तसेच ग्रामसेवक जयश्री आहेर, कर्मचारी प्रकाश शिंदे , सतिश अहिरे, पूजा मोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.शेवटी सर्वांच्या उपस्थितीत शिवरायांची आरतीने व फटाक्यांच्या आतषबाजीत समारोप करण्यात आला .

डॉ. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटेशन पध्दतीनुसार जगदीश शिंदे यांची उपसरपंच पदी वर्णी लागली .श्रीमती अनुराधा जैन यांनी आपल्या एक महिन्याच्या कालावधी नंतर मनाचा मोठेपण दाखवत उपसरपंच पदाचा राजीनामा दिला .राजकारणात शब्दाला किंमत असते .हे आजच्या निवडणूक प्रसंगी जैन यांनी दाखवून दिले .गावाच्या विकासात आपली मोलाची साथ कायम राहिल. अनुराधा जैन ,माजी उपसरपंच


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here