कनकापूर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व ; थेट सरपंच पदी बारकू वाघ

0
18
कनकापूर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व ; थेट सरपंच पदी बारकू वाघ

देवळा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कनकापूर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी उपसरपंच जे डी शिंदे ,ऍड तुषार शिंदे ,नामदेव शिंदे ,नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १० पैकी ८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले.

कनकापूर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व थेट सरपंच पदी बारकू वाघ

या ग्रामपंचायतीवर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे .यात थेट सरपंच पदी बारकू मंगळू वाघ ( ६३४ ) यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाली .

उर्वरित वार्ड निहाय विजयी उमेदवार कंसात मते वार्ड क्रमांक १ -किरण लहानू गांगुर्डे ( २३८ ) , बिबाबाई हिरामण बच्छाव (२५२), अनुराधा तुळशीराम जैन ( ३२१) , वार्ड क्रमांक २ – जगदीश नानासाहेब शिंदे ( २१७ ) सुशिलाबाई सुरेश पवार ( २५३) , बिजलाबाई सुरेश बर्डे (१७२) ; वार्ड क्रमांक ३ पांडुरंग देवमन पिंपळसे ( २२४), गोविंद आनंदा बर्वे ( २६९) जिजाबाई पोपट मोरे ( २३७) याप्रमाणे असून, निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांनी व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here