देवळा : कणकापूर ता.देवळा येथे बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून ,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची ततात्काळ दखल घेऊन याठिकाणी पिंजरा बसवावा अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे. येथील सोनशाम गोशाळामधील नर जातीच्या गोवंशीय लहान वळूवर बिबट्याने हल्ला करत त्याचा फडशा पाडला आहे.

देवळा तालुक्यातील पश्चिमेकडील अति दुर्गम अशा कणकापूर शिवारातील भाऊसाहेब शिंदे यांच्या गोशाळेतील लहान वळूला बिबट्याने ठार केले. आज बुधवार (दि.२३) रोजी सकाळी सदर घटनेची माहिती मिळताच श्री.शिंदे यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वन विभागाचे श्री.गवळी व श्री.बागूल यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
यावेळी शेतकरी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कनकापूरच्या पायथ्याशी असलेल्या एतिहासिक कांचनबारी किल्ला घाटरस्ता व कणकापूर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून गेल्या सहा महिन्यात सोनशाम गो संवर्धन गो शाळेतील तीन गाई, तीन गोरे यांचा बिबट्याच्या हाल्यात मृत्यु झाला आहे. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम