कणकापूर येथे बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना

0
26

खर्डे; कणकापूर येथील राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था , श्री कृष्ण मित्र मंडळ यांच्या विशेष प्रयत्नातून .आमदार राहुल आहेर, जिल्हानेते केदा आहेर ,युवा नेते . संभाजी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, व ग्रामपंचायत कणकापूर/कांचने ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीश शिंदे यांच्या हस्ते कणकापूर येथे बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेच शुभारंभ करण्यात आला.

तालुक्यातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथे 250 नोंदणीकृत लाभार्थी असून , पुढील काही दिवसात लाभार्थी वाढणार असून अशा जवळपास 400 बांधकाम कामगारांना एक वर्ष रोज सकाळी एक वेळचे जेवण मिळणार आहे . या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी स्वागत केले. असून ,येणाऱ्या काळात महामंडळांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे .याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी जगदीश शिंदे यांनी केले आहे .
याप्रसंगी सरपंच बारकू वाघ, सदस्य गोविंद बर्वे, पांडुरंग पिंपळसे, संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र बर्वे, सचिव योगेश गांगुर्डे उपस्थित होते .

या उपक्रमासाठी योगेश संतोष शिंदे, योगेश शिंदे , रवी शिंदे, शिवा बकुरे, ऋषिकेश गोसावी, वैभव जगताप, दिनकर मोहिते, सतिष अहिरे, भूषण महाले, चेतन वाघ, आदींचे सहकार्य लाभत आहे.मध्यान्ह भोजन वाटण्यासाठी गावातील तरुणवर्गाचे सहकार्य लाभत आहे.

खर्डे / कणकापूर येथे मध्यान्ह भोजणाचा शुभारंभ करतांना उपसरपंच जगदीश शिंदे आदींसह संस्थेचे सचिव, पदाधिकारी आदी (छाया – सोमनाथ जगताप)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here