देवळा : कणकापूर येथे युवा नेते संजय (संभाजी ) आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत व राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने ग्रामस्थांना विविध शासकीय योजनाचा लाभ देण्यात आला .
यावेळी मोफत रक्त तपासणी केलेल्या ग्रामस्थांना रिपोर्ट कार्ड वाटप, शेतकऱ्यांना मोफत पीक विमा तसेच रेशनकार्ड काढून देण्यात आले. संस्थेने याराबविलेल्या लोकाभिमुख उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच जिभाऊ शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम शिंदे , सुकदेव शिंदे , अड तुषार शिंदे , बापू शिंदे, आबा सावकार, नाना शिंदे , नितीन शिंदे, संजय जैन, संतोष शिंदे, उखा शिंदे, जगन्नाथ मिस्तरी, साहेबराव सावकार, उत्तम शिंदे, योगेश शिंदे ,हिरामण बच्छाव, आदींसह सरपंच बारकू वाघ, उपसरपंच जगदीश शिंदे, सदस्य गोविंद बर्वे, पांडुरंग पिंपळसे, बिजला बर्डे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्र संचालन रवींद्र बर्वे यांनी केल .
उपसरपंच जगदीश शिंदे यांनी ग्रामपंचायत मार्फत गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा लेखा जोखा मांडून गावाची आदर्श गावाची संकल्पना मांडली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम