कांचन बारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल

0
30
देवळा तालुक्यातील कांचन बारी घाटात पलटी झालेला ट्रक (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : तालुक्यातील कांचन बारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पायथ्याशी पलटी झाली . यात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवळा पोलीस ठाण्याचा गावठी दारू भट्ट्या उध्वस्त करण्याचा धडाका ; कारवाईने तालुक्यात खळबळ

दैव बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की ,आज रविवारी (दि ५) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास देवळयाच्या दिशेने वाळू घेण्यासाठी येत असलेला ट्रक( क्रमांक एम एच १६/सी ए ७९२९ ) हा तालुक्यातील कांचन बारी घाटाच्या पायथ्याशी ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. घाटात वाहतुकीची वर्दळ तुरळक असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र यात ट्रक चालक कानिफनाथ नारळकर (२२) ,क्लिनर गणेश बिष्णू झिपरे(२२) दोघे राहणार शेगाव बडे (अहमदनगर) हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवळा तालुक्यातील कांचन बारी घाटात पलटी झालेला ट्रक (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा पोलिसात या अपघाताची खबर देण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here