सुशिल कुवर
कनाशी: कळवण तालुक्यातील वेरूळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वेरूळे, अंबापूर दखनीपाडा आदी गावात हातभट्टीची अवेद्य दारू विक्री होत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी अभोणा पोलीस ठाण्यात व राज्य उत्पादन शुल्क वणी येथे मिळाली त्यानुसार आज कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ तसेच अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.13/08/2022 रोजी वेरूळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तसेच कनाशी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये धडक मोहीम रबावण्यात आली त्या मध्ये ऐकून 9830 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपी राजू एकनाथ कुवर, नामदेव शंकर कुवर व केशव मुरलीधर आहेर ह्या तीन आरोपिंनवर दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून आज त्यांना कळवण कोर्टात हजर केले गेले. कारवाई करतांना आढळून आलेले हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून तालुक्यातील वेरूळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अवेध दारू विक्री सुरु होती. तरुण पिढी दारुमुळे बिघडत चाललेली आहे आणि त्या मुळे त्यांचे संसार उध्वस्त होत असल्याने दारूबंदी साठी गावातील महिलांनी पुढाकार घेऊन अभोणा पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क यांचे कार्यालय गाठत तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीची दखल घेत आज राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांन मार्फत धडक कारवाई करण्यात आली.
ह्या कारवाई मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्त्रबुद्धे, एम. बी. सोनार, सुनीता महाजन, दीपक आव्हाड, महेश सातपुते, पि. एम. वाईकर, आदिसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
तसेच ह्या कारवाई मध्ये अभोणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व त्यांचे सहकारी यांचे पण सहकार्य लाभले आहे. ह्या धडक कारवाई चे परिसरातील ग्रामस्थ व महिलांनी संबंधित विभागाचे आभार मानले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम