देवळा : तालुका देवळा येथील रामरावजी आदिक माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक कैलास निकम यांना नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टिचिंग सोसायटीकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
नासिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम नुकताच झाला. दरवर्षी या सोसायटीकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात त्यात निंबोळा येथील रामरावजीआदिक माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कैलास निकम यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आला. शाळेत त्यांनी विविध उपक्रम राबविले त्यात एक मूल एक झाड ,अंधश्रद्धा निर्मूलन ,स्वच्छता अभियान, वाचन प्रकल्प ,वाचन कट्टा, असे विविध उपक्रम राबवून त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीसाठी मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळीही त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत पालकमंत्री नामदार दादा भुसे ,व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने, नाशिक डिस्टिक सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग सोसायटीचे, अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे , देवळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, देवळा कळवण संचालक संजय पाटील, शांताराम देवरे, मुख्याध्यापक गणेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विद्या प्रसारक समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील ,तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज शिरसाठ,अरुण पवार आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम