नाशिक: स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर भविष्यकाळात शिवसंग्राम चे नेतृत्व त्यांच्या धर्मपत्नी ज्योतीताई मेटे यांनी करावे तसेच भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष शिवसंग्राम म्हणून ज्योतीताई मेटे यांना राज्यपाल नियुक्त यादीतून विधान परिषदेची आमदारकी देऊन येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री करावे असा ठराव शिवसंग्राम युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत एक मुखाने संमत करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर होते.
महाराष्ट्र प्रदेश शिवसंग्राम युवक आघाडीची बैठक आज घेण्यात आली सदर बैठकीत स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम युवक आघाडीची पुढील दिशा भविष्यातील कार्यक्रम राजकीय भूमिका याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम वाढविण्याची व टिकविण्याची खरी जबाबदारी युवक या नात्याने शिवसंग्राम युवक आघाडीवर आल्याचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सांगितले. स्व.विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनी शासकीय सेवेतून बाजूला होऊन शिवसंग्रामचे नेतृत्व करावे किंवा कसे? याविषयी बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली.
यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करीत ज्योतीताई मेटे यांनी शिवसंग्रामचे नेतृत्व हाती घ्यावे व त्यांना भारतीय जनता पार्टीने राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार करून येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट दर्जाची मंत्री करून स्वर्गीय विनायकराव मेटे व शिवसंग्राम ला दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी शिवसंग्रामच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी शिवसंग्राम युवक आघाडी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही देणारा ठराव संमत करण्यात आला या यावेळी केतन महामुनी, धनंजय माळी, पांडुरंग पवार, मनोज दातीर, पांडुरंग आवारे पाटील, रामहरी मेटे, अमित पवार, निलेश गोरडे पाटील, अनिल शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम