देवळा : येथील वाजगांव रोड वरील श्रीक्षेत्र जुना मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे गुरुवार दि ३१ ऑगष्ट पासून जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज , ब्रह्मविलीन माउली महाराज ,ह भ प ब्रह्मविलीन वामनांद महाराज खर्डे तसेच वैकुंठवासी दानबिहारी दासजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व ह भ प गणेशानंद पुरीजी महाराज ,सुखानंद महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .
या सप्ताहात सात दिवस अखंड विना वादन , हरिपाठ व विविध नामवंतांचे हरी कीर्तन पार पडले .या सप्ताह प्रसंगी ह भ प निलेश महाराज ,आळंदिदेवाची ,विशवनाथ महाराज ,तळवाडेकर , दिनेश महाराज , सावकारवाडी , तुकाराम महाराज ,जेऊरकर , योगी दत्तनाथ महाराज , शिंदखेडा , कीर्तन केसरी संजय महाराज धोंडगे , देवळा ,अमृत महाराज ,अहमदनगर यांनी आपली कीर्तन सेवा बजावली . तर उद्या गुरुवार दि ७ रोजी सकाळी ९ वाजता ह भ प अमृत महाराज शिंदे ,अहमद नगर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल . या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान, जुना मारुती भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम