देवळा : जितेंद्र आव्हाड यांची जमीनावर सुटका करण्यात आल्याने येथील जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीने जल्लोष करण्यात आला . माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती.
याच्या निषेधार्थ येथील जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनात जितेंद्र आव्हाड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी ,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. दरम्यान ,आज सायंकाळी उशिरा आव्हाड यांना जामीन मंजूर होऊन सुटका झाली. यामुळे आनंद उत्सव साजरा करतात आला .
निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी , दिलीप आहेर , संतोष शिंदे , जगदीश पवार , रवींद्र आहेर , मुन्ना आढाव , मनोज गुजरे , श्रीकांत अहिरराव, विश्वनाथ गुंजाळ , गणेश आहेर ,आर व्ही पवार आदींच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम