जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी कामाला लागावे ; जिल्हाध्यक्ष केदा आहेर

0
53
भाजपच्या व्यापारी आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सुनील देवरे यांचा सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष केदा आहेर , तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, नानू आहेर ,दिशांत देवरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या कशा येतील त्या दृष्टीने प्रयन्त करायचे आहेत तसेच लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

भाजपच्या व्यापारी आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सुनील देवरे यांचा सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष केदा आहेर , तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, नानू आहेर ,दिशांत देवरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

तिन्ही गटासह सहा गणात भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे ,असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले. शुक्रवारी ( दि २५ ) रोजी देवळा येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी उमराणे येथिल प्रतिष्ठीत कांदा व्यापारी सुनील देवरे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, शहराध्यक्ष अतुल पवार, उपनगर अध्यक्ष जितेंद्र आहेर, नगरसेवक मनोज आहेर , अशोक आहेर , कैलास पवार , अजय दराडे, नितीन पांडे, भास्कर पवार, शंकर निकम, युवा मोर्चाचे योगेश आहेर, दिशांत देवरे, हर्षद मोरे, गणेश धामणकर, समाधान स्वामीं, दौलत थोरात, नदिश थोरात, सोपान सोनवणे, भाऊसाहेब आहेर, विजय आहेर, मनोज आहेर, दिलीप आहेर, प्रतिक आहेर, करण आहेर, भुषण गांगुर्डे, ज्ञानेश्वर आढाव, कैलास पवार, सुनील सावंत, रमेश मेतकर,कौतिक पवार, शेखर आहेर, रवींद्र चव्हाण, सागर भाटेवाल, निलेश पाटील आदिंसह शक्ती केंद्रप्रमुख व बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सुनील देवरे यांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ राहुल आहेर यांनी देवरे यांचे अभिनंदन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here