“झुकेगा नहीं साला” लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला ; पुष्पा 2 ची रिलिजची डेट झाली लीक

0
31

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : साऊथचा सुप्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ची वेड चाहत्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या डोक्यातून आजतागायत उतरलेलं नाही. बॉक्स ऑफिसपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत या चित्रपटाने भरगोस कमाई केली आहे. चित्रपटातील प्रत्येक डायलॉगपासून ते गाण्यांपर्यंतचे सर्व गोष्टींच वेड प्रेक्षकांना चढले होते. रील्स वर तर हे सर्व खूप गाजल होत. एवढेच काय तर या चित्रपटातील पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनचा अभिनय फक्त देशातच नव्हे तर परदेशातही पाहायला मिळाला. टीव्हीवरील सेलिब्रिटीपासून ते खेळाडूंपर्यंत सर्वच जण ‘मैं झुकेगा नहीं साला’वर स्टाईल मारताना दिसत होते.

या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित होणार असल्याचे माहिती समोर आली आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. हा दुसरा भाग पाहण्याकरिता प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.  दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाची रिलीज डेट लीक झाल्याची बातमी सतत येत आहे. ‘पुष्पा २’ ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वजन करत आहेत. तसेच अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी चित्रपटाची प्रदर्शित होणार असल्याची तारीख जाणून घेणे ही एक चांगली बातमी असेल. चित्रपटातील एका अभिनेत्याकडून त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत खुलासा करण्यात आला आहे. ‘पुष्पा’मध्ये कॉमेडियन भूमिका साकारणारा सुनीलने चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस त्याने सांगितले की ‘पुष्पा २’ या वर्षाच्या शेवटी म्हणजे २०२२ च्या शेवटी प्रदर्शित होईल.

दिग्दर्शक सुकुमार यांना असा प्रयत्न आहे की जे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटाशी बांधून ठेवतील त्याकरिता ते संवाद उत्तम करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ‘पुष्पा’चे ब्लॉकबस्टर झाल्याचे पाहून निर्मात्यांनी पुढच्या भागाचे बजेट वाढवण्याचाही विचार केला आहे. पहिल्या भागासाठी त्यांनी १९४ कोटी रुपये खर्च केला होता, तर आता निर्माते ४०० कोटींच्या आसपास पैज खर्च करण्याच्या तयारीत आहेत.

तसेच, अल्लू अर्जुन पुष्पा २ साठी त्याची फी वाढवणार असल्याची शक्यता आहे. यावेळी तो या चित्रपटाकरीत १०० कोटी रुपये मानधन घेणार आहे. तसेच, दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या फहाद फाजिलशी भिडताना दिसणार आहे, ज्याची व्यक्तिरेखा पहिल्या भागात अतिशय उग्र दाखवण्यात आली होती. त्यांच्या शत्रुत्वाची सुरुवात ‘पुष्पा’ चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आली, जी ‘पुष्पा २’ मध्ये टोकाला पोहोचणार आहे. त्याच वेळी, पहिल्या भागाप्रमाणे अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा भाग २ देखील चित्रपटगृहात आपली जादू चालवेल की नाही हे पाहणे बाकी आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here