अभियांत्रिकी jee प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE Advanced Exam 2022 तारीख वाढवली आहे.
विद्यार्थी NTA च्या अधिकृत साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरून एॅप्लिकेशन करू शकतात. एनटीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अर्ज फी जमा करण्याची तारीख 25 एप्रिल रोजी रात्री 11:50 पर्यंत राहील. तर .या परीक्षेची नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याद्वारे याआधी जेईई परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार होती. आँनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांनी परीक्षा देण्यात अनेक अडचणी येत आहेत तर विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता हा काळ वाढून देण्यात आलेला आहे. तब्बल एक महिना पुढे जेईईची परीक्षा 28 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
या परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरती भेट द्यावी. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवीन वेळापत्रक jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. जेईई परीक्षेचे दोन पेपर घेण्यात येणार आहेत. तर पहिला पेपर 9 ते 12 या वेळेमध्ये असेल तर दुसरा पेपर हा 2.30 ते 5.30 या वेळेमध्ये होणार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या जेईई परीक्षेचा निकाल सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. उत्तरपत्रिका 1 सप्टेंबर रोजी वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. 3 सप्टेंबर रोजी तात्पुरत्या उत्तर पत्रिका वेबसाईटवरती दिसतील. . 11 सप्टेंबर रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम