जयंत दिंडेंच्या उपस्थितीने देवळा शिवसेना ॲक्टीव्ह मोडवर

0
33

देवळा ;आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी ,असे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी आज देवळा येथे केले .

देवळा ; देवळा येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना संपर्क प्रमुख जयंत दिंडे समवेत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा येथे मंगळवारी (२) रोजी दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान व संवाद दौऱ्या निमित्त शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या वतीने बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दिंडे यांनी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी जिल्हाप्रमुख कुनाल दराडे , महिला जिल्हा संघटक भारती जाधव उपस्थित होते.

संपर्कप्रमुख जंयत दिंडे यांनी यावेळी देवळा येथील बैठकीस उपस्थित शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ ,तालुका प्रमुख बापु जाधव ,उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, युवासेना तालुका अधिकारी, शहर अधिकारी व महिला आघाडी , अंगिकृत संटघनेचे पदाधिकारी तसेच आजी माजी तालुका व शहर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here