मुंबई : टीम इंडियाच्या ‘मिशन टी-२० वर्ल्डकप’ ला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी व जगातील अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह अद्यापही पाठीच्या दुखापतीतून सावरला नसल्याने त्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची दुखापत जरी गंभीर असली, तरी त्याच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया होणार नाही. पण तो किमान ५ ते ६ महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
Jasprit Bumrah out of T20 World Cup with back stress fracture: BCCI sources
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2022
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा अव्वल वेगवान गोलंदाज. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारत यंदा आशिया चषकच्या अंतिम फेरीत पोहोचला नव्हता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत खेळला, मात्र त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात ही दुखापत पुन्हा उफाळली, आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. पण हा त्रास अधिक होत असल्याचे बघता त्याने ह्या मालिकेसोबतच टी-२० विश्वचषकातूनही माघार घेतली आहे.
आता बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागेवर मोहम्मद शमी किंवा दीपक चहर यांच्या नावाचा विचार बीसीसीआयकडून केला जाऊ शकतो. कारण काल झालेल्या सामन्यात दीपकने दोन महत्वाचे बळी घेतले होते. तर शमी हा अनुभवी गोलंदाज आहे. पण काही दिवसांपूर्वी तो कोविड पोझिटिव्ह झाला होता. सध्या त्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे त्याचा अनुभव पाहता तोही या मालिकेतून विश्वचषकासाठी आपली दावेदारी सिद्ध करू शकतो.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सध्याचा भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम