जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार; आबेंची प्रकृती नाजूक

0
16

दिल्ली – जपाचने माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जपानमधील नारा शहरात गोळीबार झाला. ह्या गोळीबारात आबे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. या घटनेमुळे जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे.

जपानमधील नारा येथील सभेत एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला व तिथेच जागेवर कोसळले. शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून त्यांना कार्डीयाक अरेस्टचा झटकाही आल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक तपास सुरु आहे. शिंजो आबे हे गोळीबारानंतर बेशुद्ध झाले असल्याचं सांगितलं जातंय.

सध्या या प्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. शिंजो आबे यांना एअर अँब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान ह्या भ्याड हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून असे सांगण्यात येते की, हल्ला झाल्याक्षणी ते जागेवर कोसळले आणि संशयित पळण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

दरम्यान घटनेची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांनी आमच्या प्रार्थना तुमच्या व जपानच्या जनतेसोबत आहेत, असे म्हणाले. राहुल गांधी, मनमोहन सिंह आदींनीही त्यांच्या व जपानच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे ट्विट केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here