मनोज जारांगे यांची भेट घेत विठेवाडी ग्रामस्थांनी दर्शविला पाठींबा

0
39
देवळा / अंतरवाली (सराटी) जि जालना येथे मनोज जारांगे यांची भेट घेऊन पाठींबा दर्शवितांना दिनकर जाधव ,महेंद्र आहेर ,पि डी निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : विठेवाडी ता देवळा येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी दि १० रोजी अंतरवाली (सराटी) जि जालना येथे जाऊन उपोषण कर्ते मनोज जारांगे यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शवला .

देवळा / अंतरवाली (सराटी) जि जालना येथे मनोज जारांगे यांची भेट घेऊन पाठींबा दर्शवितांना दिनकर जाधव ,महेंद्र आहेर ,पि डी निकम आदी (छाया – सोमनाथ जगताप)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली (सराटी) जि जालना येथे मनोज जारांगे हे गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत .येथील आंदोलकांवर नुकताच लाठीचार्ज झाला .या घटनेचा सम्पूर्ण महाराष्ट्रातुन सकल मराठा समाजाच्या वतीने गावं कडकडीत बंद पाळून , आंदोलन मोर्चे काढून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या उपोषणाला पाठिंबा म्हणून रविवारी दि १० रोजी विठेवाडी ता देवळा येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंतरवाली (सराटी) जि जालना येथे जाऊन उपोषण कर्ते मनोज जारांगे यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शवला .व शासनाने याची तात्काळ दखल घेऊन आरक्षण जाहीर करावे ,अशी मागणी केली. यावेळी दिनकर जाधव ,संजय सावळे ,महेंद्र आहेर ,पी डी निकम ,नंदलाल निकम आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here