ITBPच्या ३९ जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, ४ जवान शहीद

0
32

नवी दिल्ली – इंडो-तिबेट बोर्डर पोलीसच्या ३९ जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. अपघातात ४ जवान शहीद झाले तर काही गंभीर जखमी झाले.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी ITBPचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर हे जवान परतत होते. त्याचदरम्यान बस नदीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून आतापर्यंत चार जवांनाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनवाडीवरुन पहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

बचावकार्य सुरु, आणखी जवान जखमी होण्याची भीती व्यक्त

अपघात झालेल्या बसमध्ये ३९ जवान होते. ज्यामध्ये ITBPचे ३७ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या २ जवानांचा समावेश होता. जवानांना घेऊन जाणारी ही बस पहलगामच्या दिशेने जात होती. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस नदीकाठात कोसळली, अशी माहिती मिळाली. या अपघातात मोठ्या संख्येने जवान जखमी होण्याची भीती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here