द पॉईंट नाऊ ब्युरो : येत्या उन्हाळी सुट्टीत देखील शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या कारणाने सर्व प्रकारच्या शाळा – महाविद्यालये जवळपास 2 वर्ष बंद राहिली. त्यानंतर आत्ता कुठे शाळा सुरू झाल्या. मात्र अजूनही विद्यार्थी शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दरम्यान, विद्यार्थी वर्गासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांकडे मात्र मोबाईलच नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुरती वाट लागली. याच कारणास्तव आता झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, अभ्यास भरून काढण्यासाठी शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देखील सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता यात कितपत सत्य आहे? नेमका पुढे काय निर्णय होतो? हे लवकरच समजेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम