वादातून पत्नीचं भिंतीवर डोकं आपटलं नंतर पती मुलांसह झोपी गेला; सकाळी धक्कादायक बाब समोर

0
22

सातारा | म्हसवड शहरात 29 वर्षीय विवाहितेची दारूच्या नशेतील तिच्या पतीने हत्या केल्याचं समोर आलेलं आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचं भिंतीवर डोके आपटून तिचा निर्घृण खून केलेला आहे. ही घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पत्नीच्या खून प्रकरणी पतीला शिताफीने अटक करून ताब्यात घेतलेले आहे.

Malegaon | मी तुरुंगातून निवडणूक लढवेल, पण भुसेंचा पराभव करणारच

दीपाली धोंडीराम पुकळे (वय २९, म्हसवड) हिचा विवाह धोंडीराम पुकळे याच्या बरोबर झाला होता. धोंडीराम आणि पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात कवी वस्तीजवळ एका बिल्डिंगमध्ये भाडोत्री राहत होते. दीपाली ही MPSC चा अभ्यास करत होती. दीपाली आणि धोंडीराम या दोघांना दोन मुलं आहेत. रविवारी रात्री धोंडीराम दारू पिऊन आला होता. दीपालीच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडणही झाले. या भांडणात धोंडीराम याने दीपालीचे डोकं भिंत आणि जमिनीवर आपटले आणि या झटापटीत दीपालीच्या काना-नाकातून रक्त आल्यावर त्याने तिला बेडवर झोपवले होते. मुलांना जवळ घेऊन त्यांना पतीने झोपवले.  आरोपी धोंडीराम मात्र रात्रभर बसून होता.
सकाळी मुलांना धोंडीरामन यानेच चहा, बिस्किटे दिली. मुलं आईला उठवत असताना रोज भांडण झाल्यावर रागारागाने आई झोपते त्याप्रमाणे झोपली आहे, असं मुलांना वाटलं. तेव्हा धोंडीराम याने मुलांना ११ वाजेच्या दरम्यान बाहेर खेळण्यास पाठवले आणि त्यानंतर स्वतःही दुपारी दोनच्या दरम्यान घराबाहेर निघुन गेला. त्यावेळी मुलं घरी आलीत. त्यांनी आईला उठवलं पण आई उठत नाही म्हणून मुलं रडू लागली. त्यानंतर शेजारी राहणारे लोक त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिले, तर एक धक्कादायक बाब समोर आली. दिपाली मृत्युमुखी पडलेली होती.
याबाबत कोडलकरवाडी येथे राहणाऱ्या दीपालीच्या आई-वडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पत्नीचा खून करून पती एका ठिकाणी दडून बसलेला होता. त्याला पोलिसांनी शिताफीने पत्नी दीपाली हिचा खून केल्याप्रकरणी अटक करून ताब्यात घेतलेले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी धाव घेतली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ खुनाचा अधिक तपास करत आहेत.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here