आपल्यासाठी हळदीचे दूध उपाय कारक आहे की घातक???

0
40

लहानपणापासून आपली आई आपल्याला हळदीचे दूध द्यायचि खोकला ,ताप, सर्दी काहीही असो यावर एकच रामबाण उपाय म्हणजे हळदीचे दूध.

थंडीमध्ये अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हळदीचे दूध हे सर्वांसाठी उपाय कारक आहे का हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे? तर हळदीचे दूध हे सगळ्यांसाठी उपाय कारक नसते कधी कधी प्रकरण उलटे सुद्धा पडू शकते. तर त्यासाठी कोणत्या लोकांनी हळदीचे दूध प्यावे आणि कोणत्या लोकांनी पिऊ नये हे समजून घेऊया.

सर्वात प्रथम जर तुम्हाला अॅनिमिया असेल तर तुम्ही हळदीचे दूधाचे सेवन करू नये. कारण तुमचे शरीर आयर्नचे योग्य प्रकारे शोषण करू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढत नाही. या परिस्थितीत हळदीचे दूध तुमच्या शरीरासाठी घातक असू शकतात म्हणून तुम्ही ते पिणे टाळावे.

हळदीचे दूध किडनीचा आजार असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे. हळदीमध्ये ऑक्सलेट असल्याने किडनीचा आजार अधिक गंभीर होऊ शकतो . अशा लोकांनी त्यांना किडनीचा आजार आहे हळदीचे दूध पिले तर त्यांच्या समस्या कमी होण्याचा जागी अधिक वाढतील.

अनेकदा ज्यांना पोट दुखी होते अन्न पचण्यास कठीण जाते ऍसिडिटी होते . या लोकांनी जर हळदीचे दूध पिले तर पचनशक्ती अजून कमी होऊ शकते. कारण अशा लोकांना पोट फुगणे, छातीत जळजळ होणे किंवा पोटात गॅस बनणे अशा समस्या उद्भवू शकतात.

शेवटचा आणि महत्त्वाचे ज्यांना ब्लड शुगर आहे त्यांनी हळदीचे दूध पिणे जास्त टाळावे. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी करू शकते. आधीच शुगर कमी असणे आणि ही पातळी जर आणखी कमी झाली तर या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here