Nashik-Mumbai Highway ला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा सवाल

0
50

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात  राज्यात हायवे वर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यातच Nashik-Mumbai Highway वर प्राजक्त देशमुख यांच्या गाडीचा अपघात झाला आणि चित्रपट संवादलेखक आणि अभिनेता प्राजक्त देशमुख Prajakt Deshmukh यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

आज सकाळी प्राजक्त यांनी आपल्या गाडीला अपघात झाल्याची बातमी शेअर केली आहे. या अपघातात प्राजक्त देशमुख सुखरूप आहेत. त्यांनी रस्त्यावरील वाहतूकीवर आपले मत व्यक्त केले आहे. प्राजक्त यांच्या गाडीला अपघात झाला असून ते सुखरुप बचावल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

लाखो ग्राहकांना फटका; Vodafone-Idea चे नेटवर्क झाले गायब

प्राजक्त देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नाशिक-मुंबई हायवे Nashik Mumbai Highway वरुन धावणारे अवजड वाहने बेशिस्तीने चालवतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला.मी थोडक्यात बचावलो. नशिबाने मी सुखरुप आहे परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लावत दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम? या अपघातानंतर पुन्हा एकदा रोड सेफ्टीचा गहन मुद्दा चर्चेत आलेला आहे. या ट्वीटच्या माध्यमातून प्राजक्त देशमुख यांनी बेशिस्त वाहतुकीकडे यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here