Landslide in raigad : इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला; 6 मृत्यू तर 100 जण अडकले, नाशिककरांना पालकमंत्र्यांचे आवाहन

0
17

Landslide in raigad : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याचा देखील समोर आल आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ ईर्षालवाडी हे गाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. गुरुवारी पहाटेचे सुमारास गावकरी गाढ झोपेमध्ये असताना अचानक पणे गावावर दरड कोसळली आणि जवळपास संपूर्ण गाव यामध्ये उध्वस्त झाल आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांकडून घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं.

या घटनेमध्ये 100 पेक्षा अधिक लोक अधिकाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आतापर्यंत 75 जणांना बाहेर काढण्यास यश आल आहे. यापैकी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 70 जणांना नवी मुंबई मधील एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

First solar flour mill in Nashik district : नाशिक जिल्ह्यातील या गावाने उभारली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी पिठाची गिरणी

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीची पाहणी करत स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
जी आपत्कालीन यंत्रणा आहे. त्यात एसडीआरएफ एनडीआरएफ यांचा समावेश आहे. तर महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणच्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत आणि सर्वतोपरी नागरिकांना मदतीच्या सूचना देखील दिल्या आहेत. नागरिकांची गैरसोय, त्रास आणि जीवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देखील संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ असलेल्या इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 48 कुटुंब या ठिकाणी आहेत. सुमारे 75 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलं असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दरम्यान मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल आणि जखमींचा उपचार खर्च राज्य सरकार करेल असे देखील त्यांनी जाहीर केलं तसेच आम्ही सर्व परिस्थितीवर आणि मदत बचाव कार्यावर सातत्याने लक्ष ठेवून असणार आहोत असे देखील फडणवीस यांनी सांगितल आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवडी गावावर दरड कोसळली यात 40 ते 50 घरे मातीच्या ढिगाऱ्यात अडकली आहेत. यात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 35 जणांना वाचविण्यात आले आहे. या नैसर्गिक अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली, या कुटुबियांच्या तसेच गावाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. घटनास्थळी NDRF च्या टिमसह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांसह रात्री एक वाजेपासून घटना स्थळी उपस्थित आहे. नाशिक करांनी देखील धोकादायक ठिकाणाहून बाजूला सुरक्षित ठिकाणी थांबावे, मी रात्री जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पालकमंत्री कार्यालय नाशिक या ठिकाणी संपर्क साधावा

दादाजी भुसे
पालकमंत्री नाशिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here