आयपीएलच्या ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वीकारली निवृत्ती!

0
39

the point now: वेस्ट इंडिज टीमचा अष्टपैलू आणि आयपीएलमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड (KIERON POLLARD) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. हि बातमी पोलार्डने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

पोलर्डने या पोस्टमध्ये सांगितले की, ‘मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघात खेळावं असे माझे स्वप्न होते. गेल्या पंधरा वर्षांपासून टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करत आलो आहे. पण, आता मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ पोलार्डने केलेल्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत पोलार्डने 123 वन डे, 101 20-20सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर त्याने वन डे मध्ये 2706 आणि 20-20त 1569 धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याच्या नावावर एकूण 97 विकेट्स आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here