Dhule : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील २१ जून २०२३ रोजी पोलीस कवायत मैदान, धुळे येथे सर्व समावेशक आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती, धुळे चे प्रमुख संयोजक व भाजपा सरचिटणीस, धुळे मा. ओमप्रकाश खंडेलवाल, अतुल दहिवेलकर यांच्या मार्गदर्शनात सुमारे दहा हजाराच्या संख्येने आबालवृध्द नागरिक, विद्यार्थी इत्यादींनी शिस्तबध्द रितीने सहभाग नोंदवला. महिला वर्गान मोठ्या संख्येने उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनातील अधिकारी व कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
प्रमुख मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. धुळे लोकसभा खासदार मा. डॉ. सुभाषजी भामरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मा. ओमप्रकाश खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले. खान्देश प्रबोधिनीचे अध्यक्ष मा. अतुल दहिवलकर, आणि धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. रविजी बेलपाठक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पतंजली योग समितीचे डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी योग प्रात्यक्षिकाचे संचलन केले. गायत्री परिवाराचे मा. सुधाकरदादा बेंद्रे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमित गोराणे यांनी केले.
प्रमुख मान्यवरात मा. आमदार जयकुमार भाऊ रावल, मा. आमदार अमरीशभाई पटेल, मा. महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, मा. अध्यक्ष जि.प. सौ. अश्विनीताई पाटील, मा. जिल्हाधिकारी जलत शर्मा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भुवनेश्वरी एस. मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, संजय बारकुंड, मा. शिक्षणाधिकारी मोहन देसले, मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी सौ. रेखा पाटील, एम. के. पाटील हे उपस्थित होते.माजी आमदार मा. राजवर्धनजी कदमबांडे, धुळे भाजपा अध्यक्ष अनुपजी अग्रवाल, पांझरा पोळ संस्थेचे अध्यक्ष मा.राजेंद्रजी महाले, भारत स्वाभिमान न्यासचे मा. प्रितमसिंग ठाकूर, योगविद्याधामचे कार्याध्यक्ष मा. यशवंत पाटील, ब्रह्मकुमारी राजयोग सेवा केंद्राच्या मा. बाल ब्रह्मचारिणी रिटा दिदी, भुपेंद्र मालपुरे यांनी कार्यक्रम संयोजनात निमंत्रकाची भूमिका पार पाडली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. राजश्री शेलकर, अँड. वाय. एल. जाधव, राजेंद्र बारे, भुपेंद्र मालपुरे, मनोहर चौधरी, अमित गोराणे, नरेंद्र मराठे, अनिल संचेती, राकेश जैन, किरण मांडे, मनोज सोनार, प्रकाश पांडे, डॉ. आनंद पवार, राजेंद्र शिंदे, पंढरीनाथ बडगुजर, उमेश मुधोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर फलहाराचे वाटप करण्यात आले संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी एकत्रित परिश्रमामुळे कार्यक्रम शिस्तीत व उत्साहात संपन्न झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम