उस्मानाबाद : ऑन ड्युटी अन् तेही चक्क गणवेशात इंस्टाग्राम रिल्स बनवणे जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला चांगलेच महागात पडलेले आहे. एसटी महामंडळाकडून सदर महिला कंडक्टरचे निलंबन करण्यात आले आहे.
मंगल सागर गिरी असे या निलंबित एसटी महिला कंडक्टरचे नाव असून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहे. त्यांच्या या रिल्समुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाली असल्याचे कारण देत मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच कल्याण कुंभार या वाहतूक कंट्रोलरचेही निलंबन महामंडळाने केले आहे.
सोशल मीडियावर या महिला कंडक्टरचे लाखो फॉलोअर्स आहेत. मंगल या अनेक गाण्यांवर रिल्स बनवून सोशल मीडियावर त्या व्हायरल करतात. परंतु, त्यांचा एक व्हिडियो सध्या जोरात व्हायरल झालाय. त्यात त्या महामंडळाचा गणवेशात, तेही ऑन ड्युटीमध्ये तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडियो बनवून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. मात्र त्यांच्या याच व्हिडीओमुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचा व्हिडियो बनवणारा वाहतूक कंट्रोलर कल्याण कुंभार याचेही निलंबन करण्यात आले आहे.
https://www.instagram.com/reel/CimufOzPEJu/?utm_source=ig_web_copy_link
एसटी संपात सहभागी न झाल्यामुळे माझे निलंबन – गिरी यांचे आरोप
दरम्यान, गिरी यांचे निलंबन झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी एसटी महामंडळावर गंभीर आरोप केले आहे. यावेळी त्यांनी एसटीच्या संपात सहभागी झाले नसल्याचा राग ठेवत एसटीच्या अधिकाऱ्यांनी माझे निलंबन केले असल्याचा आरोप केला आहे. तसेच आगाराच्या आवारात अनेक जण ऑन ड्युटी व्हिडियो बनवतात, मात्र त्यांच्यावर कारवाई करायची सोडून माझ्यावरच निलंबनाची कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे माझे फॉलोवर्स कमी झाले, असा दावाही त्यांनी केला आहे.
आजकाल सोशल मिडीयाच्या जमान्यात रिल्स बनवण्याची क्रेझ सध्या लहान मुलांपासून चाळीशीतल्या लोकांपर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावरील ह्याच रिल्सच्या अनेकजण रातोरात स्टार झालेले आतापर्यंत आपण पाहिले आहेत. त्यामुळे हे रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण वाट्टेल ते करतात, त्यात अनेक तरुण-तरुणी तर ह्याच्यासाठी कुठल्याही थराला जातात. परंतु, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेकांच्या नोकऱ्यादेखील गेलेल्या आहेत. असाच प्रकार सदर महिला कंडक्टरच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे इतरवेळी काहीही करा पण कामाच्या वेळी काम करा, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून येत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम