स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आशिया चषकातून बाहेर; अक्षर पटेलला संधी

0
30

दिल्ली दुबईत आशिया चषकाचा थरार सध्या रंगत आहे. आतापर्यंत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका या संघानी सुपर ४ फेरी गाठली आहे. तर आज होणाऱ्या हॉंगकॉंग आणि पाकिस्तान यांच्यातला विजयी संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल.

स्पर्धा आता मुख्य टप्प्यावर आली असतानाच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले आहे.

बीसीसीआयने याबाबत जाहीर निवेदनातून माहिती देताना सांगितले, की रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. विशेष म्हणजे अक्षर पटेलला याआधी संघातील एक स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते. तो लवकरच दुबईत संघासोबत सामील होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here