Onion Market| खरीपाच्या रांगड्या कांदयाची आवक सुरू; किंमतीही वाढणार..?

0
24


Onion Market|  राज्यात खरीप हंगामाच्या लाल कांद्याचे घटलेले उत्पादन आणि येणाऱ्या नवीन कांद्याच्या पुरवठ्यात तफावत असल्याने कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा पाऊस कमी असल्याने नाशिक जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरीप लाल कांद्याच्या लिलावाला सुरुवात होते. पण, यावर्षी आवक कमी होण्याची शक्यता आहे. 

लाल कांद्याचे घटलेले उत्पादन आणि नवीन कांद्याच्या पुरवठ्यात तूट असल्याने दर उंचावलेले असण्याची  शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खारी फाटा (उमराणे) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केट तसेच मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारात  मुहूर्ताला प्रतिक्विंटल ११,१११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगरच्या श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये २१७ वाहनांतून खरीप लाल कांद्याची ११८५ क्विंटल इतकी आवक झाली. तर खडकतळे (ता. देवळा) येथील कैलास पगार यांच्या कांद्यांना उच्चांकी ११,१११ रुपयांची बोली लागली होती. लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ११,१११ आणि सरासरी ३,०५८ रुपये इतका दर मिळाला. लिलावप्रसंगी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, उमराणा गावचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, श्रीरामेश्वर कृषी मार्केटचे संचालक श्रीपाद ओस्तवाल, संचालक- पुंडलिक देवरे, सचिव- दौलतराव शिंदे, व्यापारी- संतोष बाफना,प्रवीण बाफना,दिनेश देवरे, योगेश पगार, दीपक गांगुर्डे, चिंधू खैरे, नितीन काला, उज्ज्वल देवरे आदी उपस्थित होते.

Kojagiri 2023 | कावडधारी निघाले भगवतीच्या दर्शनाला…

मुंगसे उपबाजारात उपसभापती विनोद चव्हाण यांच्या मुहूर्ताचा लिलाव झाला. मुहूर्तावेळी मुंगसे येथील शेतकरी सुधाकर रौंदळ यांनी बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ११ हजार १११ रुपयांचा भाव मिळाला. राहुल आडतचे संचालक तसेच कांदा व्यापारी राहुल सूर्यवंशी यांनी बोली लावत ११ हजार १११ रुपये ह्या दराने नवीन खरीप लाल कांदा खरेदी केला. येथे ११९ वाहनांतून १,१९० क्विंटल लाल कांद्यांची आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल किमान १,०५० ते कमाल ११,१११ आणि सरासरी ३,२५० रुपये असा दर मिळाला.

लागवड कमी आणि आवकही कमी… 

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला ह्या तालुक्यांत खरीप लाल कांदा लागवड सर्वाधिक असते. पण, यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे, दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात सुरु होणारी नवीन लाल कांद्याची आवक यंदा मात्र कमी झाली आहे. लागवडी उशिरा झाल्यामुळे  बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आहे. पण आवकच नाही तर गुणवत्ताही जेमतेमच आहे. उन्हाळ कांद्याची प्रतवारी घडली असून, दुसरीकडे सड होऊन साठा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघता, खरीप लाल कांद्याचे घटलेले उत्पादन आणि नवीन कांदा पुरवठ्यातील तुटीमुळे कांद्याच्या भावांत तेजी राहण्याची चिन्हे दिसत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Nashik | मेथीच्या जुडीला सोन्याचा भाव; सणासुदिला गृहिणींचं बजेट कोसळणार 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here