सणासुदीनिमित्त रेल्वेची विशेष भेट; बाहेरगावी जाण्यासाठी १७९ विशेष ट्रेन्स सोडणार

0
27

दिल्ली : नुकताच देशभरात दसरा मोठ्या उत्साहात पार पडला. आता सर्वत्र दिवाळीची व इतर सणांची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकाला दिवाळीनिमित्त गावी जाण्याची ओढ लागलेली असते. म्हणूनच रेल्वेने खास सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नोकरी व व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून अन्य ठिकाणी गेलेल्यांना नागरिकांसाठी १७९ विशेष ट्रेन्सची व्यवस्था केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने याबाबत निवेदनाद्वारे अधिक माहिती देताना सांगितले की, आगामी सणासुदीचा काळ बघता परराज्यात राहणाऱ्या प्रवाश्यांना आपल्या गावी जाण्यासाठी व सणासुदीच्या काळात प्रवाश्यांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष १७९ गाड्या छठपूजेपर्यंत सोडत आहेत. या विशेष गाड्यांच्या एकूण २ हजार २६९ फेऱ्या रेल्वे चालवत आहे.

तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबाबत ट्वीटरवरून ही माहिती देत देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने छठपूजेपर्यंत विशेष ट्रेनच्या २ हजार २६९ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

याशिवाय, दिल्ली, मुंबई, कोलकाता या ठिकाणांपासून देशभरातील प्रमुख ठिकाणांहून जोडण्यासाठी विशेष ट्रेनची योजना तयार करण्यात आली आहे. तसेच, अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांच्या पद्धतशीर प्रवेशासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत स्थानकांवर रांगा तयार करून गर्दीचे नियंत्रण केले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here