अखेर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे पुन्हा सवलत देणार, मात्र वयाचे निकष बदलणार

0
29

नवी दिल्ली – विविध स्तरांतून चौफेर टीका झाल्यानंतर अखेर रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्याचा विचार करत आहे. मात्र या सवलती फक्त सामान्य आणि शयनयान श्रेणीसाठी असतील, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

आता रेल्वे यासाठी वयाच्या निकषांत बदल करुन प्रवास भाडे सवलत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल. आधी ही वयोमर्यादा महिलांसाठी ५८ वर्षे आणि पुरुषांसाठी ६० वर्षे होती. यामागचे मुख्य कारण ज्येष्ठांसाठी सबसिडी कायम राखत या सवलतीमुळे रेल्वेवर पडणाऱ्या आर्थिक बोजाचे समायोजन करणे, असे रेल्वेकडून सांगण्यात येते. या सवलतींमुळे ज्येष्ठांना मदत होते, हे आम्ही समजून आहोत. सवलती पूर्णत: रद्द केल्या जातील, असे आम्ही कधीही म्हटलेले नव्हते. याबाबत आम्ही योग्य आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

२०२० मध्ये कोरोना महामारीपूर्वी ही सवलत ५८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या महिला आणि ६० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांसाठी होती. ५० टक्के महिला तर ४० टक्के पुरुष आणि विपरित लिंगी सर्व श्रेणीतील व्यक्ती ह्या सवलतीचा लाभ घेऊ शकत होती. तसेच रेल्वे ह्या सवलती फक्त बिगर-वातानुलिकरण श्रेणीच्या प्रवासापुरतीच मर्यादित करण्याची तरतूद करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्याला यश मिळाले नाही.

तसेच रेल्वे सर्व ट्रेनमध्ये प्रीमियम तत्काळ योजना सुरू करण्याच्या पर्यायावरही विचार करत आहे, त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यास मदत मिळेल व सवलतींचा बोजा उचलण्यास उपयोगी होऊ शकतो. ही योजना सध्या ८० ट्रेनमध्ये आहे. या योजनेत काही आसने मागणीनुसार मूल्य निर्धारित करून आरक्षित केली जातात. हा कोटा शेवटच्या क्षणी प्रवासाची योजना करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांसाठी आहे, ज्यांची थोडा अतिरिक्त खर्च करण्याची तयारी असते. प्रीमियम तत्काळ भाड्यात मूळ प्रवासभाडे आणि अतिरिक्त तत्काळ शुल्काचा समावेश असतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here