नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित – पंतप्रधान मोदी

0
15

कोच्ची – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे आज अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे नौदलाच्या या नव्या ध्वजाचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांशी खास कनेक्शन आहे.

भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या उद्घाटनावेळी केरळमधील कोच्चीमध्ये ह्या नव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलताना, आपण गुलामीतून मुक्त झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

नव्या ध्वजामध्ये पूर्वीच्या ध्वजात असलेला सेंट जॉर्जचा क्रॉस हटवून हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा वापरण्यात आली. राजमुद्रेच्या आत नौदलाचे चिन्ह आहे. याआधी तीनवेळा नौदलाच्या ध्वजात बदल झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीस भारतीय सुरक्षा दलांनी ब्रिटीशकालीन ध्वजच पुढे ठेवला होता. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा या ध्वजामध्ये बदल होऊन त्यामध्ये युनियन जॅकऐवजी तिरंगा लावण्यात आला. मात्र, सेंट जॉर्ज यांचा रेड क्रॉस मात्र तसाच होता. ठराविक काळानंतर दोनवेळा या ध्वजात बदल करण्यात आले. २०१४ मध्ये ध्वजावर सत्यमेव जयते ही ओळही लिहिण्यात आली होती.

या नव्या ध्वजातून ब्रिटीशांच्या सर्व खुणा हटवण्यात आल्या असून आता या ध्वजावर संपूर्णपणे भारतीय छाप असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. हा नवा ध्वज आपण भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. हा नवा ध्वज सेनेच्या आत्मबळ आणि आत्मसन्मानाला नवी उर्जा देईल, असेदेखील मोदी म्हणाले. ह्या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान व केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here