टीम इंडियाने मिळवला दक्षिण आफ्रिकेवर सामना व मालिका विजय

0
29

दिल्ली : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीत रंगलेला तिसरा एकदिवसीय सामना टीम इंडियाने ७ गड्यांनी जिंकत ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे.

कर्णधार शिखर धवनने टाॅस जिंकत दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वातावरण आणि खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने दक्षिण आफ्रिकेची आघाडीची फळी माघारी धाडली. त्यानंतर कुलदीप यादव आणि शाहबाजच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळला. व दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या २७.१ षटकांमध्येच ९९ धावावर आटोपला. कुलदीपने ४.१ षटकात एक निर्धाव षटक टाकताना १८ धावात ४ बळी घेतल्या. तर सिराज, शाहबाज आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन बळी घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिच क्लासेनने सर्वाधिक ३४ धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या भारतीय फलंदाजांनी अवघ्या १०० धावांचे आव्हान १९.१ षटकात सहज गाठले. यावेळी सलामीवीर शुभमन गिल (४९) आणि फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या (२८) खेळीने भारताला शेवटच्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. कर्णधार शिखर धवन (८) व ईशान किशन (१०) हे मात्र या सामन्यात अपयशी ठरले. कुलदीप यादव सामनावीर ठरला असून मोहम्मद सिराज या मालिकेत मालिकावीर ठरला आहे.

सलग पाच मालिका जिंकण्याचा पराक्रम 

यंदाच्या वर्षात टीम इंडियाने सलग पाच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. फेब्रुवारीपासून भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्ध एकदा मालिका विजय साजरा केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here