IND vs AUS Final | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप २०२३ फायनलची लढतीची तयारी सुरू झालेली आहे. या लढतीचे सर्व अपडेट द पॉइंट नाऊ सोबत जाणून घ्या…
Nashik news | नाशकात हे घडतंय काय..? चिमुकल्याला तव्याचे चटके, मग लाथाबुक्क्यांनी मारहाण
गेल्या ४४ दिवसांपासून १० संघात सुरू असलेली स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरू होणार आहे. भारतीय संघ ज्यांनी स्पर्धेत एकही लढत गमावलेली नाही आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया ज्यांनी सर्वाधिक ५ विजेतेपद आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघातील या महामुकाबल्याकडे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.
Nashik News | अंजली दमानिया यांच्या आरोपांवर स्पष्टच बोलले समीर भुजबळ
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांना काही गोष्टी आत घेऊन जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. स्टेडियमवर पर्स आणि तिकीट वगळता अन्य कोणत्याही गोष्टी नेता येणार नाहीत. तसेच पाण्याची बॉटल आणि झेंडे वगळता अन्य गोष्टींवर बंदी घातलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्डकप फायनल मॅचच्या आधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी झाली.
गूगल कडूनदेखील शुभेच्छा
वर्ल्डकप २०२३ ला गूगल कडूनदेखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गूगलने डूडल तर्फे वर्ल्डकप २०२३ शुभेच्छा दिलेल्या आहे. तसेच अनेक भारतीय नेत्यांकडून देखील संपुर्ण भारतीय टिमला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम