सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांनी आपल्या शरीराकडे तब्येतीकडे लक्ष देणे सोडून दिले आहे.पौष्टिक आहार सोडून जंक फूड खाद्यपदार्थांन कडे बहुसंख्य लोक वळले आहेत.
परिणामी पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसते. स्पर्म काउंट कमी असलेल्या पुरुषांची संख्या तातडीने वाढते. या अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर तुम्ही काय कराल. या परिस्थितीत तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला स्पर्म काउंट कसं वाढवायचा ते सांगणार आहोत.
आपल्या वीर्यामध्ये प्रति मिलिलिटर 15 दशलक्ष पेक्षा कमी शुक्राणू (Sperm Count) असल्यास शुक्राणूंची संख्या सामान्यपेक्षा कमी मानली जाते. आणि ज्या पुरुषांना बाहेरचे जाऊन पुढ खाण्याची खूप सवय असते उदाहरण पिझ्झा, बर्गर प्राईज, मोमो , या खाद्यपदार्थांमध्ये सोडा आणि रेड मीट इत्यादी पाश्चात्य पदार्थांचा समावेश असतो, या पुरुषांची शुक्राणूंची संख्या ही सामान्य आहार किंवा पौष्टिक आहार घेणाऱ्या पुरुषांपेक्षा कमी असते. दुसरीकडे जे जास्त पाश्चात्य पदार्थ खातात, त्यांच्यामध्ये प्रजननक्षमता वाढवणाऱ्या प्रजनन संप्रेरकांची (reproductive hormones) कमतरता देखील असते. याशिवाय जर तुम्ही जास्त प्रमाणात सिगरेट पीत असाल दारूचे सेवन करत असाल तर या गोष्टींमुळे स्पर्मचा काउंट कमी होण्याची शक्यता अधिक वाढते.
जास्त प्रमाणात सिगरेट पिणे, दारू पिणे, पौष्टिक आहार न खाता बाहेरचे जंक फूड खाने, चरबी फॅट वाढवणाऱ्या पदार्थांमुळे आणि घट्ट अंतर्वस्त्रामुळे सुद्धा तुमचा स्पर्म काउंट कमी होतो. तुम्हाला तुमचा स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर या गोष्टी टाळावे पौष्टिक पदार्थ खावेत जंक फूड सोडून द्यावं मध्यापान आणि धूम्रपानाचे व्यसन करू नये या सर्व गोष्टींमुळे तुमचा स्पर्म काउंट कमी होणार नाही तर अधिक प्रमाणात वाढेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम