Educational news | शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन टप्प्यातील महत्त्वाच्या बोर्डाच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा पद्धतीत हा बदल केला जाणार आहे. यानुसार आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. दिवाळीपूर्वी एक सत्र व मार्चमध्ये दुसरे म्हणजेच अंतिम सत्र होणार आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांप्रमाणे सहामायी व वार्षिक पद्धतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही होणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार याची अंमलबजावणी ही २०२४-२५ किंवा २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. अनेकदा या बोर्डाच्या परीक्षांत अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी टोकाची पाऊलं उचलतात.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हा बदल करण्याचे ठरवले आहे. त्यासोबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मतंही मागवली आहे.
Weather Updates | राज्यात या भागांत पुढील ४-५ दिवस अवकाळी पावसाचा इशारा
बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची क्षमता तपासता येत नाही, असे वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत काही बदल करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती अशीच राहू द्यावी का?, ह्या प्रश्नांवर लोकांची मते काय आहेत हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला जाणून घ्यावयाचं आहे. त्यानंतर दोन वर्षातच आता ही नवीन पद्धत लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल व त्यांच्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा दुसरी संधी मिळेल. शिवाय, एका सत्रात कमी गुण मिळाले तरी दुसऱ्या सत्रात जास्त अभ्यास करण्याची संधी असणार आहे. तसेच, ह्या नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांमधील मजकूर कमी करून तो मनोरंजक बनवला जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पण, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक हे विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच शिकवतील. पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षादेखील सत्र पद्धतीने होतील. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र हे दिवाळीपूर्वी आणि दुसरे सत्र हे मार्च महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षाही होणार आहे. नंतर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे एकत्रित गुण करून बोर्डाच्या माध्यमांद्वारे निकाल प्रसिद्ध केला जाईल. यावेळी, पहिल्या सत्राचे गुणही विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहेत.
Malegaon | अद्वय हिरे यांना आता न्यायालयीन कोठडी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम