द पॉईंट नाऊ ब्युरो : एस टी महामंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दारू पिऊन चालकाने एस टी बस चालवू नये या उद्देशाने संबंधीत चालकाची नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
एस टी बसच्या कोणत्याही चालकाने दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. यामुळे एस टी महामंडळाने निर्णय घेत, आता बस चालकाची वैद्यकीय चाचणी केली जाईल. आणि याबाबत पोलिसांत तक्रार देखील दाखल केली जाईल. महाराष्ट्रात महामंडळाच्या सर्वच आगारांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
एस टी चा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य माणूस हा एस टी महामंडळाच्या बस द्वारेच प्रवास करतो. आणि यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही संबंधित बसच्या चालकावरच असते. त्यामुळे दारू पिऊन बस चालवणे सर्वच प्रवाशांना महागात पडू शकते. या अनुषंगाने एस टी महामंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम