Igatpuri | इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात विशाखा समिती अंतर्गत मुलींच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डाॅ. तेजस्विनी मेदडे (सामुदायिक आरोग्य अधिकारी, घोटी ग्रामीण) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थींनीसाठी उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात डाॅ. तेजस्विनी मेदडे यांनी स्रीयांच्या आरोग्य विषयक समस्या तसेच किशोरवयीन अवस्थेत मुलींच्या मासिक पाळीच्या समस्यांसाठी नियमीत संतुलित आहार घेणे, व्यायाम-योगा करणे, त्याचबरोबर रक्तवाढीसाठी आवश्यक असणा-या व्हीटामीनयुक्त गोळ्या-औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्यविषयक काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. किरण रकिबे यांनी मुलींनी आरोग्यविषयक काळजी घेणे जितके गरजेचे आहे. तितकेच आपल्या सुरक्षिततेबाबत दक्ष असले पाहीजे. यासाठी महाविद्यालयातील महिला जिमचा वापर करून शारीरिक व मानसिक सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला पाहीजे. शिक्षक-पालक यांच्याशी नेहमी संवाद ठेवून चांगल्या-वाईट गोष्टी बाबत वेळोवेळी आपले मत-भावना व्यक्त करणे गरजेचे आहे.
Igatpuri | टाकेद येथे महाराजस्व अभियान संपन्न;नागरिकांच्या विविध समस्यांचे झाले जागेवरच निवारण
कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा चांगला प्रतिसाद
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व सांगता पसायदानाने झाली. प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय प्रा.सविता काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना पाटील तर आभारप्रदर्शन प्रा. शितल थेटे यांनी केले या प्रसंगी प्रा. सुनिता बेनाडे, प्रा. मीना जोशी, प्रा. अनिता चौधरी व मोठ्या संख्येने विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम