‘एकही मराठी माणूस अयोध्येत दिसला, तर शरयू नदीत बुडवून मारू’

0
17

द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी नुकतेच मुंबईत मारहाण झालेल्या काही बिहारी तरुणांना समोर आणल्यानंतर त्यातील एकाने एक जरी मराठी माणूस अयोध्येत दिसला, तर त्याला शरयू नदीत बुडवून मारू असा इशारा दिला आहे.

मनसे द्वारे महाराष्ट्रातील परप्रांतीय लोकांविरोधात आंदोलन केले गेले होते. तसेच काहींना मारहाण देखील झाली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी नुकतेच त्या वेळी मारहाण झालेल्या बिहार, उत्तर प्रदेशातील मुलांना पत्रकारांसमोर आणले.

या मुलांमधील एकाने आम्हाला त्यावेळी झालेली मारहाण आणि त्याचा त्रास अजून विसरलेलो नाही. ती मनसेची माणसं होती. त्यामुळे आता 5 जून पर्यंत एक जरी मराठी माणूस अयोध्येत दिसला, तर त्याने शरयू नदीत बुडवून मारू, असा इशारा दिला आहे.

या प्रकारामुळे आता राजकारणापासून सुरू झालेले हे प्रकरण आता मराठी माणसाच्या जीवावर उठल्याचे दिसून येऊ लागले आहे. मराठी माणसाच्या जीवाला अयोध्येत धोका आहे, असे या तरुणाने दिलेल्या इशाऱ्यावरून दिसून येत आहे. आता या प्रकारानंतर मनसे यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here