मराठा आरक्षण | खासदार राजीनामे का देत नाही ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चीघळलेला असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचारात पाहायला मिळत आहे. आम्ही मराठा समाजा सोबत आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील खासदार यांना केलेलं आहे.
Onion Price| सरकारचा पुन्हा कांदा उत्पादकांन विरोधात मोठा निर्णय; कांद्याचे दर पुन्हा पडणार..?
नितीन गडकरी, कराड, पियुष गोयल, डॉ. भारती पवार या केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीत मांडावा. या केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील हा ज्वलंत विषय पंतप्रधानापर्यंत पोहोचवावा. केंद्रात तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा असा देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत.
गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी हे राजीनामा सत्र सुरु आहे अशी घणाघाती टीकाही उद्धव टाकरे यांनी शिवसेना गटाच्या राजीनामा देणाऱ्या नेत्यांवर केलेली आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील तरुणांना विंनती केलेली आहे. हिंसाचार घडवून महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
40 वर्षांचा मराठा आंदोलनाचा प्रवास; अण्णासाहेब पाटील, जयश्री पाटील अन् आता जरांगे पाटील
काल मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली. त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एकाला डेंग्यू झाला असं कळलं तर दुसरे उपमुख्यमंत्री मराठा आणि महाराष्ट्रापेक्षा रायपूरला प्रचारासाठी गेलेत. आपलं राज्य जळत असताना लोकं रस्त्यावर उतरली असताना दुसऱ्या राज्यातील पक्षाचा प्रचार महत्त्वाचा वाटतो असे नेते या समाजाला न्याय देऊ शकतो का? हा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की, टोकाचं पाऊल उचलू नका. तुमच्या सारख्या लढवय्यांची समाजाला आणि राज्याला गरज आहे. मराठा समाजातील तरुणांना विंनती करतो की, त्यांनी आत्महत्येसारख टोकाच पाऊल उचलू नका. आपसात मतभेद, जाळपोळ होईल असं काही करु नका” असं आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परीषदेत केलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम