सरकारी बँकांमध्ये ६०००हून अधिक पदांसाठी मेगाभरती; ही आहे शेवटची तारीख !

0
32

मुंबई – सरकारी बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (IBPS) वतीने मेगाभरती करण्यात येणार आहे.

आयबीपीएसच्या वतीने केल्या जाणाऱ्या भरतीप्रक्रियेत क्लर्क आणि प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी मेगाभरती केली जाईल. या पदभरतीचे नोटीफिकेशनही जाहीर करण्यात आले. त्यानुसार तब्बल एकूण ६४३२ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यापही क्लर्क/पीओ पदासाठी अर्ज केले नाही, त्यांनी आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट www.ibps.in वरुन आपला अर्ज करू शकता.

२ ऑगस्टपासून भरतीप्रक्रियेला सुरुवात झालेली असून आयबीपीएसच्या वतीने तसे नोटीफिकेशन जारी करण्यात आले होते. या पदासाठीची परीक्षा येत्या दोन महिन्यांत होऊ शकते. तर मेन्स परीक्षा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागले. तर एससी, एसटी आणि पीएच प्रवर्गासाठी १७५ रुपये फी आकारली जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी शुल्कही ऑनलाईन पद्धतीने जमा करता येऊ शकतो.

कोणत्या बँकेत किती पदे ?

बँक ऑफ इंडिया – ५३५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया – २५०० जागा

पंजाब नॅशनल बँक – ५०० जागा

पंजाब एन्ड सिंध बँक – २५३ जागा

यूको बँक – ५५० जागा

यूनियन बँक ऑफ इंडिया – २०९४ जागा

पात्रता काय?

आयबीपीएसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मेगाभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. वयोमर्यादा ३० वर्ष वय असणाऱ्यांना इच्छुकांना भरतीप्रक्रियेत अर्ज करता येणार आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here