Maharashtra politics | मी पंतप्रधानांच्या कार्यालयात कोरोना संदर्भातील बैठकीसाठी गेले. नवीन खासदार असल्याने मी मागील रांगेत बसले. त्यावेळी राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे पत्र मला देण्यात आले. त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी ते पत्र वारंवार वाचले. पतीलाही वाचायला सांगितले, हे जुन्या आठवणींत रमत केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. भारती पवार यांनी विविध प्रसंग सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सध्या मध्य प्रदेश निवडणुकीत बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या समन्वयक आहेत. येथील प्रचारानंतर त्या रावेल जळगाव येथे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटल्या. मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारानंतर त्यांनी त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमादरम्यानच्या वर्गमैत्रीण डॉ. सुचिता कुयटे यांच्या रावेर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी शहरातील मंडळीही उपस्थित होती. यावेळी गप्पांमध्ये त्यांनी विविध प्रसंग सांगितले.
त्या म्हणाल्या, कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या एका बैठकीस मी गेले होते. तेव्हा तातडीचा दौरा म्हणून फक्त दोन साड्या नेल्या, एक साधी साडी नेसून मी बैठकीला गेली होती. नवीन खासदार असल्याने मागच्या रांगेत मी बसले होते.
यावेळी माझ्या हातात एक पत्र दिले. त्यात मी राज्यमंत्री म्हणून शपथ घ्यायची असे लिहिले होते. ते पत्रावर माझा विश्वासच बसेना. मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, आनंदही झाला. मी ते पत्र अनेकदा वाचले. नंतर पतींनाही वाचायला दिले, तेव्हा कुठे माझा विश्वास बसला. मी एवढ्या लवकर मंत्री होईल असे मला कधीच वाटले नव्हते. तसा दिल्लीच्या राजकारणाचा फार अनुभवही नव्हता.
त्यामुळे शपथविधीपूर्वी, मंत्रीपदाची शपथ कशी घ्यायची, प्रोटोकॉल कसे असतात. हे समजून घेत मी आधी दोन तास शपथ घेण्याचा सराव केला, असे डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सहभागी होण्याचे माझ्या ससऱ्यांचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाल्यामुळे शपथ घेतल्यावर डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
Diwali 2023 | ही ऑफर चुकवू नका..! सॅमसंगचे महागडे फोन फक्त १५ हजारात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीमही त्यावेळी नवी होती. पण, पंतप्रधान सर्वांकडून तयारी करून घेणारे, सहकाऱ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे व्यक्तिमत्त्व आहेत. पंतप्रधान ‘आमचं म्हणणं ऐकून घेतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं तसेच शिकायला मिळणं हे आमचं भाग्य आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात भारताच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. डॉ. पवार बराच काळ आपल्या शिक्षणादरम्यानच्या सहकाऱ्यांसोबत गप्पांत रमल्या होत्या. डॉ. कुयटे व डॉ. भगवान कुयटे यांच्या घरी आयोजित कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांचा साधेपणा हा सर्वांनाच भावला.
Nashik | वायू प्रदूषणाबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसची शहरात जनजागृती
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..