Educational : गोठ्यात भरतेय जिल्हा परिषदेची शाळा. जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी गोठ्यात शिक्षण घेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तहसील हद्दीत असलेल्या खिरू तांडा येथील भयावह वास्तव.
एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डिजिटल शाळांचा समावेश असताना दुसरीकडे लोहा तालुक्यातील खिरुतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी इमारत नसल्याने जनावरांच्या गोठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. Educationalहे धक्कादायक चित्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील खिरुतांडा येथील जिल्हा परिषद शाळेच आहे. येथे इमारती अभावी विद्यार्थ्यांना गोठ्यातच शिक्षण घ्यावे लागत आहे.
लोहा तालुक्यातील खिरुतांडा हे ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या जवळपास 800 च्या आसपास आहे. गावातील ९० टक्के लोक ऊस तोडणीसाठी दर सहा महिन्यांनी गावाबाहेर पडतात. Educational यामुळे गावातील मुले शिक्षणासाठी गावात असलेल्या नातेवाईकांकडे सोडली जातात. मात्र या गावात कोणतीही सुविधा नाही. या तांड्यात 2000 साली जिल्हा परिषद शाळा मंजूर झाली. हळूहळू या शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. मात्र शाळेसाठी इमारत उभी राहिलीच नाही. इमारत नसल्याने शिक्षकांना सुमारे 10 बाय 5 आकाराच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये शाळा भरावावी लागते आहे. या जनावरांच्या शेडमध्ये बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असून सध्या 22 विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत.
खिरुतांडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून ही भयावह परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते. Educationalशाळा भरण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने पाऊस पडला की विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते.
जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष
सरकारी कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नांदेड येथे आले होते. स्वातंत्र्यापासून खिरुतांडा गावात शाळेच्या इमारती शिवाय पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, स्मशानभूमीची गंभीर समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला अद्याप खिरुतांडा गावाच्या दारापर्यंत पोहोचता आलेले नाही.Educational दरम्यान, कृष्णा राठोड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांना केवळ आश्वासन मिळाले. निवडणूक आली आहे, लोक फक्त मते मागायला येतात, निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी गावातही आले नाहीत, असा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.
*शाळेच्या इमारतीचे पैसे आले पण….*
खिरूतांडा येथील जिल्हा परिषद शाळांच्या बांधकामासाठी 2015 मध्ये आठ लाख रुपये मिळाले होते. गावातील 9 एकर जागेवर बांधकाम करण्याचे ठरले, मात्र लांडगेवाडी ग्रामपंचायतीने कोणताही निर्णय दिला नाही. याबाबत जिल्हा प्रशासन निर्णय घेऊ शकते, मात्र निर्णय न झाल्याने शाळा बांधकामाचा विषय प्रलंबित राहिला. आलेले पैसे परत गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आमच्या सरकारच्या सोयी कधी येणार, अशी विनवणी ग्रामस्थ करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम