उत्तराखंडमधील चमोली येथे भीषण अपघात, कार दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

0
44

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : उत्तराखंडमधील चमोली येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील जोशीमठ ब्लॉकमध्ये बोलेरो मॅक्स अचानक ७०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, एसडीआरएफलाही माहिती देण्यात आली. सध्या टीम मदतकार्यात गुंतली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो मॅक्स कारमध्ये १६ जण होते.

अपघाताबाबत एसडीआरएफकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. एसडीआरएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, चमोलीच्या पल्ला जाखोल गावात दुमका रोडवर वाहन ५००-७०० खोल दरीत पडले. त्यात १६ जण होते. बचावकार्य सुरू असून पांडुकेश्वर येथून एसडीआरएफची आणखी एक टीम रवाना करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here