Horoscope 9 May 2024 | अहंकारामुळे नाते दुरावतील; वाचा आजचे राशीभविष्य

0
18
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 9 May 2024 |  पंचांगानुसार आज ९ मे २०२४ गुरुवारचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. आज ग्रहांमुळे वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, शोभन योग, गजकेसरी हे योग असतील. यांचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल. आज सकाळी ७ ते ८ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ६ पर्यंत असे दोन शुभ मुहूर्त आहेत. तर, दुपारी १.३० ते ३ पर्यंत राहुकाल असेल. जाणून घेऊयात आज गुरुवार ९ मे २०२४ चा दिवस हा सर्व राशींसाठी कसा असेल..? वाचा आजचे राशीभविष्य…

मेष राशी –

शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी परिस्थिती आज असेल. जर आज व्यवसाय किंवा शेतीसाठी काही नवीन उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत करा. नोकरदार लोकांना आज अधिक कामे करावे लागतील.(Horoscope 9 May 2024)

नवीन काम सुरू करायचे असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, जुन्या आजारांपासून आराम मिळेल. योगा आणि व्यायामावर लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेम किंवा वैवाहिक जीवनात आज नात्यात आनंद आणि गोडवा कायम राहील. विद्यार्थ्यांना यशासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागेल.

वृषभ राशी –

शौभान आणि गजकेसरी योगाचा आज वृषभ राशीच्या लोकांना फायदा होईल. यामुळे नोकरदार वर्गाच्या लोकांसाठी पगारवाढीसाठी सकारात्मक वातावरण असेल. व्यावसायिकांना आज संयमाने काम करावे लागेल. तरंच यश मिळेल. आज तुम्ही इतरांवर अवलंबून राहणे टाळावे.

राजकीय व्यक्तींना आज तुमची कामे मार्गी लावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे. तरुणांचा इतरांवरचा अतिविश्वास आज त्यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरू शकतो. त्यामुळे सावध रहा. खुप दिवसानंतर आज वेळ काढून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ निवांत गप्पा मारू शकता. आर्थिक नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा. (Horoscope 9 May 2024)

मिथुन राशी –

आज व्यावसायिकांनी पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नये. आज तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिकांनी कायदेशीर बाबींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. नोकरदार वर्गाच्या लोकांसाठी आज विरोधक अडचणी निर्माण करतील. त्यामुळे आज तुम्हाला चुका करणे टाळावे लागेल.

भूतकाळातील चुकांमुळे आज राजकीय व्यक्तींचे चालू असलेले काम बिघडेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आहाराबाबत काळजी घ्यावी. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी वाद घालणे टाळा. अन्यथा विनाकारण घातलेला वादामुळे टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते.  (Horoscope 9 May 2024)

कर्क राशी –

व्यावसायिकांच्या आज आर्थिक समस्या संपतील. तसेच आज तुमचे व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. यामुळे तुमचा दिवस आज आनंदात जाईल. मात्र, ऑफिसमध्ये कोणाशी वाद होऊ शकतात. ते टाळावे लागतील. (Horoscope 9 May 2024)

आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, मधुमेहाच्या रुग्णांना आज आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. आज मोठ्या भावासोबत चांगले समन्वय ठेवा. यामुळे आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात किंवा प्रेम संबंधात आज नात्यात गोडवा राहील. विद्यार्थ्यांना नोकरीत यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

Horoscope 1 May 2024 | ‘या’ लोकांसाठी आजचा दिवस तोट्याचा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope 9 May 2024 | सिंह राशी –

ग्रहांच्या बदलांमुळे आज सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तरंच आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना मेहनत करावी लागेल. तरच पैसे मिळतील. नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज बॉसला तक्रार करण्याची संधी देऊ नये, अन्यथा हे तुमच्यासाठी तणावाचे कारण असेल.

राजकीय व्यक्तींना आज कुठल्याही सामाजिक व राजकीय स्तरावर बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.  आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुम्ही आज विषाणूजन्य तापामुळे त्रस्त असाल. वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेम संबंधांत आजचा दिवस जोडीदारासोबत मजेत जाईल.(Horoscope 9 May 2024)

कन्या राशी –

व्यावसायिकांना आज व्यवसायात जाहिरातींचा फायदा होईल. शौभान आणि गजकेसरी योगामुळे तयार झाल्याने नोकरदार वर्गाच्या लोकांना आज नवीन नोकरी मिळेल. तरुणांनी स्वतःवर आणि त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. तणाव असल्यास कुटुंब व मित्रांसोबत वेळ घालवा किंवा मित्र व कुटुंबासोबत सहलीचेही नियोजन करू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आज जोडीदारासोबतचे गैरसमज दूर करण्यात तुम्हाला यश येईल. (Horoscope 9 May 2024)

तूळ राशी –

व्यावसायिकांनी आज कुठलीही गुंतवणूक करू नये. नोकरदार वर्गाच्या कामाच्या ठिकाणी पगाराच्या बाबतीतील ठेवलेल्या अपेक्षा फोल ठरू शकतात. आज तुमच्यासाठी घाई आणि अतिआत्मविश्वास दोन्हीही घातक ठरू शकतात. त्यामुळे आज तुम्ही अतिरेक करू नये. राजकीय व्यक्तींचे आज आळस आणि थकवा यामुळे कुठलेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही.

प्रेम आणि वैवाहिक जीवनात आज जोडीदारासोबतचे वाद टाळा. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा शब्दांमुळे तुमच्याकडून काहीतरी चूका होऊ शकतात. आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच एकटेपणाही जाणवू शकतो.  (Horoscope 9 May 2024)

वृश्चिक राशी –

व्यावसायिकांना व्यवसायात लक्ष केंद्रित करावे लागेल. आज तुम्ही व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करण्याच्या विचारात असाल तर, ते सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत करणे शुभ असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांचे आज कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमच्या कामाचे कौतुक करेल.

तसेच आज चांगल्या कामगिरीमुळे तुमच्या बढतीचेही मार्ग मोकळे होतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुम्हाला लठ्ठपणा आणि निद्रानाशाची समस्या जाणवेल. राजकीय व्यक्तींचे सामाजिक आणि राजकीय पातळीवरील कामामुळे तुमची प्रगती होईल. तरुण वर्ग आध्यात्मिक मार्गाकडे वळेल आणि त्यांची आध्यात्मिक विचारसरणी दिवसेंदिवस वाढत जाईल. (Horoscope 9 May 2024)

Horoscope 6 May 2024 | ‘या’ व्यक्तींनी विरोधकांपासून सावध रहा; वाचा आजचे राशीभविष्य

धनु राशी-

व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे आणि कामाचे नियोजन करावे. राजकीय व्यक्तींनी सामाजिक स्तरावर कोणतेही काम करताना त्याबाबत संशोधन करणे गरजेचे आहे.

आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, सांधेदुखीच्या रुग्णांना आराम मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही भेट मिळेल. तुम्हाला गरज पडल्यास मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलाच्या भविष्यासाठी आज तुम्ही काही गुंतवणुकीचे नियोजन करू शकतात. (Horoscope 9 May 2024)

मकर राशी –

शौभान आणि गजकेसरी योगामुळे आज तुम्ही तुमच्या एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकतात. व्यावसायिकांना कामाच्या पद्धती बदलाव्या लागतील. आज ऑफिसमधील काही गोष्टींमुळे नोकरदार व्यक्तींचा काम करण्याचा उत्साह आणखी वाढेल. मात्र, आज कार्यालयात सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात ते शक्यतो टाळा. (Horoscope 9 May 2024)

राजकीय व्यक्तींना आज सामाजिक व राजकीय पातळीवर बोलताना तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकतात. प्रेम आणि जोडीदाराला आज वेळ देऊ शकाल. महिलांना आज त्यांच्या कलागुणांमुळे चांगली संधी मिळू शकते.

कुंभ राशी –

व्यवसायात काही कामे उघड झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. व्यावसायिकांना आज व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा काळ जरा अवघड असेल. नोकरदार वर्गाचे लोक आज त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करू शकतील.

राजकीय व्यक्तींनी आज सामाजिक स्तरावरील कामासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य राहील. विद्यार्थ्यांना थोडा संघर्ष करावा लागेल. आज जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखवू शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, पचनाचा त्रास होऊ शकतो.(Horoscope 9 May 2024)

मीन राशी –

आज कुठल्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, ते काळजीपूर्वक वाचा आणि त्याबाबत अनुभवींसोबत चर्चा करून मगच पुढचे पाऊल उचला. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज सहकाऱ्यांचीही कामे करावी लागू शकतात. राजकीय व्यक्तींचा आज विश्वासघात होऊ शकतो.

आज मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेणे टाळा. कुटुंबात आज विवाहयोग्य व्यक्तीच्या लग्नाबाबत चर्चा होईल. स्त्रियांचा आदर करा. प्रेम संबंधांत किंवा वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि विनाकारण वाद टाळा. अन्यथा टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते. आरोग्याबाबत सावध रहा, जेवणाच्या वेळा पाळा. बाहेरचे खाणे टाळा. (Horoscope 9 May 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here