8 सप्टेंबर 2022, गुरुवारचा दिवस सर्व राशींसाठी खास असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज काही बाबतीत नुकसान होऊ शकते. वृषभ राशी वाल्यांनी सावधान रहावे, इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घेऊया राशीभविष्य
मेष- दिवस उर्जावान असेल. चिंता समस्या दूर होतील. कार्यक्षेत्रात धनलाभ होईल. आपल्या कामाशी काम ठेवा. इतरांशी बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नका. वाणीवर संयम ठेवा. मनातील गुप्त गोष्टी कुणाही सोबत सामायिक करू नका.
शुभ अंक 5, शुभ रंग शेंदरी.
वृषभ- प्रयत्नांना यश मिळेल. भाग्याची ही साथ लाभेल. आपल्या कार्याचे कौतुक केले जाईल. गुंतवणूक करायची असेल तर आज करू शकता. नोकरी, व्यवसायात बदल करण्याच्या विचारात असाल आज त्याबद्दल विचार करून निर्णय घेऊ शकता. प्रेमीं युगलांसाठी दिवस उत्तम आहे.
शुभ अंक 3, शुभ आकाशी.
मिथुन- कुठलीही गुंतवणूक करण्यासाठी आज चा दिवस तितका चांगला नाही. संधी आणि प्रलोभनांना ओळखून निर्णय घ्यावा. आपल्या पात्रते पेक्षा अधिक जोखीम घेणे टाळा. उधार घेऊ नका आणि देऊ ही नका. विनाकारण संबंधात गैरसमज व मतभेद होतील.
शुभ अंक 3 शुभ रंग लाल.
कर्क- आज आपल्यासाठीअत्यंत शुभ दिवस आहे. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. जो ही निर्णय घ्याल त्यात सकारात्मक परिणाम दिसून येईल. कार्यक्षेत्रात, व्यवसायात किंवा नोकरीत सर्व ठिकाणी यश मिळेल. उच्च अधिकारी तुमच्यावर खुश होतील. गुंतवणूक करू शकता. बऱ्याच दिवसांपासून मनात ठरवून ठेवलेले महत्वाचे कार्य पूर्णत्वाकडे जाईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
शुभ अंक 2 शुभ रंग केसरी.
सिंह- आत्मविश्वासाने कार्य केल्यास यश नक्की मिळेल. पूर्वीपासून चालत आलेले वाद विवाद सुटतील. धैर्याने काम घ्या. आज तुम्हांला अशी मोठी संधी येऊ शकते ज्याने तुमचे आयुष्य बदलून जाईल. गुंतवणूक करू शकता. वादविवादात समोरच्यावर वरचढ ठराल. तरीही वाद विवादा पासून दूर राहा. व्यापारी वर्गासाठी व प्रेमीं युगलांसाठी ही दिवस चांगला आहे.
शुभ अंक 1, शुभ रंग जांभळा.
कन्या- आज आपला दिवस व्यस्थ असेल. व्यापार, व्यवसायात फायदा होईल. चिंता दूर होतील. ठरविलेली कार्य पूर्ण होतील. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर आज करू शकता. मित्र आणि सहकारी ह्यांचे सहकार्य लाभेल. एकंदरीत दिवस उत्तम आहे. व्यापारी वर्गासाठी व प्रेमीं युगलांसाठी दिवस उत्तम.
शुभ अंक 4, शुभ रंग क्रीम.
तुला- शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करतांना विचारपूर्वक करा जाणकार व्यक्ती च्या सल्ल्याने करा. व्यापार व व्यवसायात फायदा होईल. घरातील आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून त्यांची मने दुखवू नका. महत्वाची मिटिंग, मुलाखतीस दिवस सकारात्मक आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमीं युगलांसाठी दिवस चांगला आहे जुन्या आठवणींना उजाळा द्याल.
शुभ अंक 5, शुभ रंग पांढरा.
वृश्चिक- आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. कुठलाही महत्वपूर्ण निर्णय आज घेऊ शकता.खुश खबर मिळेल. धनलाभ होईल. पुरस्कार किंवा उपहार आज आपल्या मिळू शकतो. आपल्या जवळच्या लोकांकडून सहयोग मिळेल. व्यवसाय, व्यापारात फायदाच संभवतो. आज कुणासोबत झालेले मतभेद व मनभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केल्यास नाते पुन्हा पूर्ववत होईल. गुंतवणूक करू शकता. प्रेमीं युगलांसाठी आज दिवस उत्तम आहे.
शुभ अंक 8, शुभ रंग पिवळा.
धनु- अत्यंत शुभ दिवस आहे.धनलाभ होणार. कार्यक्षेत्रात लाभ होईल. सर्व बाजूने सहयोग प्राप्त होईल. कामामुळे दिवस व्यस्थ राहील. तुमच्या आत्मविश्वासाने आज कुठलेही कार्य तडीस नेण्याचे सामर्थ्य आपल्यात असेल. डोक्यातील कल्पनांचा योग्य प्रकारे वापर करून लाभ मिळवू शकता. प्रेमीं युगलांसाठी दिवस अत्यंत उत्तम आहे.
शुभ अंक 3, शुभ रंग पिवळा.
मकर- योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास आज आपल्या यश हमखास मिळेल. पूर्वी ठरवलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्यास शंभर टक्के पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिक आणि व्यापारी वर्गास दिवस अत्यंत शुभ आहे. गुंतवणूक करू शकता. व्यर्थ जोखीम घेणे टाळावे. कार्यक्षेत्रात लाभ होईल उन्नती होईल. कर्जाची देवाण घेवाण आज टाळावी. जोडीदाराचे मन दुखवू नये.
शुभ अंक 2, शुभ रंग गुलाबी.
कुंभ- धैर्याने प्रत्येक कार्यास सामोरे जा. तुमचा समजूतदारपणा तुम्हाला परिस्थिती बाहेर काढेल. प्रवाहाच्या विरोधात जाऊन आज कुठल्याही गोष्टी करणे टाळावे. आर्थिक विषयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. वादविवादा पासून दूर राहा. कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. गुंतवणूक करणे टाळावे. कुणालाही उधार पैसे देने टाळावे अथवा पैसे फसू शकता. मानसिक अशांतता जाणवेल.
शुभ अंक 2, शुभ रंग हिरवा.
मीन- सर्वार्थाने आज चा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. बऱ्याच काळा पासून तुमचे अडकलेले पैसे आज मिळतील असे योग आहे.
कार्यक्षेत्रात पूर्णपणे यशस्वी व्हाल. व्यावसायिक व व्यापारी वर्गासाठी ही दिवस अत्यंत शुभ आहे. आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. संपत्ती खरेदी करू शकता. थोडा मानसिक ताण जाणवू शकेल.
शुभ अंक 3, शुभ रंग ब्राऊन.
ज्योतिषशास्त्री
शाशीसुत;
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम