मेष, तूळ, मकर आणि धनु राशीने करू नये हे काम, जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

0
31

मेष- कुठले सरकारी काम जे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होते ते पूर्ण करण्यासाठी योग्य दिवस आहे. थोडी मानसिक अशांतता जाणवू शकते. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही दिवस उत्तम आहे. कार्यक्षेत्रात लाभ होईल. व्यापारी वर्गासाठी दिवस लाभदायी आहे.
शुभ अंक 4 शुभ रंग केसरी.

वृषभ- धनलाभ होईल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या स्वभातील दुर्गुण अथवा व्यसन सोडण्यासाठी आज चांगला दिवस आहे. निरर्थक तणाव घेऊ नका. आर्थिक देवाण घेवाण करतांना विचारपूर्वक करा. दुसऱ्यांच्या वादविवादात पडू नका. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराची साथ लाभेल.
शुभ अंक 2 शुभ रंग ग्रे.

मिथुन- मानसिक अशांतता असेल. घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका अथवा आर्थिक नुकसान होईल. आत्मविश्वासाने गोष्टींचा सामना करा. कमीतकमी बोला समोरच्याचे ऐका.कटू शब्दांचा वापर करणे टाळा. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
शुभ अंक 1 शुभ रंग पांढरा.

कर्क- वाहन चालवताना सावधानपणे चालवावे दुर्घटना होऊ शकते. जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक करू शकता. व्यवसायी लोकांसाठी दिवस चांगला आहे कुठलाही निर्णय घायचा असेल तर घेऊ शकता. व्यापारी वर्गास आज लाभ संभवतो गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक 5 शुभ रंग क्रीम.

सिंह- आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा आपल्या जवळच्या लोकांची मने दुखावल्या जातील.
मेहनतीने कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात वाद विवाद संभवतात तेव्हा शब्दांचे चयन काळजीपूर्वक करा. कुठलेही नवीन काम सुरू करणे आज टाळावे. अनावश्यक खर्च करणे टाळा. प्रेमीं युगलांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 1, शुभ रंग नारंगी.

कन्या- धनलाभ होवू शकतो. संततीच्या समस्या दूर होतांना दिसत आहे. गुंतवणूक करू शकता. कार्यक्षेत्रात लाभ होईल. कुणासाठी ही अभद्र भाषेचा वापर करू नका. व्यापारी वर्गास भागेदारी ने लाभ होऊ शकतो. एकंदरीत दिवस चांगला आहे.
शुभ अंक 3 शुभ रंग जांभळा.

तुला- गृहकलह होऊ शकतो म्हणू काळजी घ्यावी की घरातील जेष्ठ व्यक्तींशी बोलताना नम्रपणे बोलावे.
आज थोडे फार संतुलन बनवून कार्य करावे लागेल अथवा अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यस्थता राहील. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
शुभ अंक 2 शुभ रंग लाल.

वृश्चिक- आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. गुंतवणूक करू शकता. आज यश तुमचा पाठलाग करेल. कुठलेही कार्य करतांना पूर्ण पारदर्शकता ठेवून करा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नये, केवळ अत्यंत विश्वासु व्यक्तीचाच सल्ला घ्या. कामात ढकला ढकल करू नका,मेहनत घ्यावी तर लागेल. व्यापारी वर्गास उत्तम दिवस आहे मोठी गुंतवणूक करायची असेल तर आज करू शकता. व्यर्थ खर्च टाळावा.
शुभ अंक 4 शुभ रंग गर्द आकाशी.

धनु- आर्थिक लाभाच्या अनुषंगाने दिवस उत्तम आहे. वडिलोपार्जित संपत्ती संदर्भात काही वाद असतील असतील तर ते दूर होतांना दिसत आहे. कार्यक्षेत्रात अधिक जबाबदारी वाढेल. नातेसंबंधात काही खटकले होते तर त्या संबंधात सुधारणा होईल. आपसातील गैरसमज बसून दूर करा. व्यापारी वर्गास दिवस शुभ असेल परंतु वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
एकंदरीत दिवस ठीकठाक आहे.
शुभ अंक 5, शुभ रंग गुलाबी.

मकर- आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुमच्या प्रतिष्ठेला सांभाळ लोक तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. अपेक्षित असे यश मिळतांना दिसत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बेरोजगार असाल तर नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. व्यापारी वर्गाने नवीन कामात हात घालण्या आधी पूर्वीचे कार्य आधी पूर्ण करावे. खोटें बोलण्याची सवय आज अडचणीत टाकू शकते. जोडीदाराचा मूड आज खराब झालेला जाणवेल.
शुभ अंक 3, शुभ रंग हिरवा.

कुंभ- अति आत्मविश्वास करणे टाळावे. कुठलेही अनाधिकृत, अशासकीय कार्य करणे टाळावे किंवा असा जो कुणी असेल त्याच्या पासून दूर राहावे. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाशी वादविवाद होऊ शकतात. पूर्वी केलेल्या कामातून फायदा संभवतो. कोर्ट कचेरीच्या कामात तुमच्या बाजूने निर्णय होऊ शकतो. कुणालाही पैसे उधार देऊ नये. प्रेम संबंधात अडचणी येऊ शकता.
शुभ अंक 3 शुभ रंग परवा.

मीन- आजचा दिवस आपणांस अत्यंत शुभ आहे.प्रगती होईल. गुंतवणूक करावी. कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल. सहकाऱ्यांकडून पूर्ण सहयोग मिळेल. अचल संपत्ती संदर्भात कुठले काम होत नव्हते ते आज होईल. व्यापारी वर्गास दिवस अत्यंत शुभ आहे कामा संदर्भात कुठे प्रवास करत असाल तर फायदा होईल. वादविवादात पडू नका. उसने पैसे कुणाला देऊ नका. जोडीदाराची साथ लाभेल.
शुभ अंक 2, शुभ रंग केसरी.

ज्योतिषशास्त्री
शाशीसुत;


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here